मुंबई
संमिश्र जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी मंगळवारी नफा मिळवला. त्यामुळे सात दिवसांपासून सुरू असलेली तेजी थांबली. सेन्सेक्स २८८ अंक घसरून ५९, ५४३वर आणि निफ्टी ७४ अंकांच्या घसरणीसह १७,६५६च्या पातळीवर बंद झाला. रिलायन्स, एफएमसीजी, बँकिंग, वित्तीय आणि ग्राहक समभागांवर नफा वसूल करण्याचा दबाव होता. दुसरीकडे कॅपिटल गुड्स, ऑटो, आयटी, टेक आणि हेल्थकेअर समभागात तेजी दिसली. १३-२४ ऑक्टोबर दरम्यान सात दिवसांच्या वाढीमध्ये सेन्सेक्स २,५९६ अंक (४.५४%), निफ्टी ७१६ अंकांनी (४.२१%) वाढला होता. एफएमसीजी आणि बँक समभागांमध्ये नफा घेण्याच्या दबावामुळे बाजाराने नफा गमावला.