लंडन
यूके कंपनी कॉस्मोट्रॉनने रॉकेटसारखे डिझाइन असलेले दोन स्पीकर लाँच केले. कॉस्मोट्रॉन १३० आणि कॉस्मोट्रॉन ५० अशी त्यांची नावे आहेत. त्याचे कॅबिनेट ब्राँझचे बनलेले आहे. यामध्ये ३१६ स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात आला आहे. हा स्पीकर घरातील एका खास प्रकारची कलाकृती वाटतो. त्याचे वजन ३२४ किलो, लांबी १६३ सेमी आणि रुंदी ८० सेमी आहे. ते खूप जड आहे. किंमत ९.१६ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.