बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्मा सध्या ‘अनुपमा’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. मदालसा शर्मा ‘अनुपमा’ मालिकेत काव्याची व्यक्तिरेखा साकारते आहे. मदालसा शर्मा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. या फोटोंमध्ये मदालसा निळ्या रंगाचा क्रॉप टॉपमध्ये दिसत आहे. मदालसाचा जन्म अभिनय क्षेत्राशी निगडीत असलेल्या कुटुंबात झाला आहे. ती बीआर चोप्रा यांची मालिका महाभारतमध्ये देविकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री शीला शर्मा आणि निर्माते व दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी आहे. मदालसाचे लग्न मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोहसोबत झाले आहे.