मुंबई
सरकारी बँकेच्या कर्मचार्यांची चांदीच चांदी झाली आहे. पंजाब नॅशनल बँकेने आपल्या अधिकार्यांना मोठी भेट दिली आहे. दुसर्या क्रमांकाच्या सार्वजनिक बँकेने आपल्या अधिकार्यांना मोबाईल हँडसेट विकत घेण्यासाठी वर्षाला दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. आता एवढ्या किंमतीत ते आयफोन, सॅमसंगचा नोट किंवा महागडे फोन घेऊ शकणार आहेत.
पीटीआयनुसार कर्मचारी कल्याणच्या नियमांमध्ये पीएनबी बँकेने सुधारणा केली आहे. याद्वारे पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) उच्चाधिकार्यांना 2 लाख रुपयांचा हँडसेट भत्ता दिला जाईल. यामध्ये व्यवस्थापकीय संचालक (चऊ) आणि कार्यकारी संचालक यांचा समावेश आहे. पंजाब नॅशनल बँकेचे चार कार्यकारी संचालक आहेत.
या उच्चपदस्थ अधिकार्यांना मोबाइल हँडसेट खरेदीसाठी दरवर्षी दोन लाख रुपये मिळतील, असे अहवालात म्हटले आहे. झछइ बोर्डाच्या निर्णयानुसार, सुधारित नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू होणार आहेत, असे सुत्रांनी सांगितले. बँकेतील मुख्य महाव्यवस्थापक साठी मोबाईल फोनसाठीची पात्रता पूर्वीच्या स्तरावर कायम ठेवण्यात आली आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, उॠच् साठी हँडसेट भत्ता वार्षिक 50,000 रुपये आणि ॠच् साठी 40,000 रुपये निश्चित केला आहे.