नवी दिल्ली
भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा फलंदाज सिंकदर रझानं एकाकी झुंज दिली. त्यानं 95 चेंडूत 115 धावांची खेळी केली. परंतु, झिम्बाब्वेच्या संघाला विजय मिळवून देण्यास तो अपयशी ठरला. झिम्बाब्वेच्या संघाला 15 धावांची आवश्यकता असताना तो बाद झाला. परंतु, या सामन्यात शतक झळकावून सिंकदर रझानं सर्वांच लध वेधलं. तसेच भारताचा माजी क्रिकेटपटून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या विक्रमाशी बरोबरी साधलीय.
झिम्बाब्वेचा स्टार खेळाडू सिकंदर रझानं ऑगस्ट 2022 मध्ये तीन अर्धशतक ठोकले आहेत. यापूर्वी त्यानं बांग्लादेशविरुद्ध एकदिवसीय मालिकेत धावांचा पाठलाग दोन शतकं झळकावली होती. या कामगिरीसह त्यानं सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी साधलीय.