मुंबई एक्स्पोज
मुंबई:
मुंबईत हुक्काबंदी नक्की आहे का? असा प्रश्न आता मुंबईकरांवर विचारण्याची वेळ आली आहे. याला कारणही तसेच आहे. मुंबईत घरपोच हुक्का सेवा पुरवणारी एक मोठी टोळी सक्रिय असून या टोळीचे वांद्रे, जुहु, अंधेरी (लोखंडवाला), ओशिवारा या उच्चभ्रुपरीसरात मोठे झाळे पसरले आहे. या टोळीचा संपुर्ण कारभार हा गोरेगाव राममंदीर येथील म्हाडा इमारतींमधून चालतो. एक-दोन नाही तर चक्क 15 ते 20 जण घरपोच सेवा देण्यासाठी या टोळीसाठी काम करतात. झोमॅटोप्रमाणे बाईक्स वरुन किंवा गाड्यांच्या डिक्कीमधुन हे सामन पुरवले जाते. विविध सेलिब्रेटीजच्या ‘इन हाऊस पार्टीज’ तसेच ‘बर्थ डे पार्टीज’ ला हुक्का पुरवला जातो.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत घरपोच हुक्का सेवा पुरवणारी एक मोठी टोळी गोरेगाव राममंदीर येथील म्हाडा इमारतींमधून सक्रिय असून याची माहिती मुंबई पोलीसांना खरोखरच नाही का? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. मुंबईतील मोठमोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्येही ही टोळी हॉटेलच्या सुरक्षेला चकमा देऊन हुक्का पुरवत आहेत. यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याचे नाकारता येऊ शकत नाही. महत्त्वाचे म्हणजे 15 ते 20 जण कार-बाईक्स हुक्का घेऊन अख्खी मुंबई पालथी घालत असताना मुंबई पोलीस काय करतात असे बोलले जात आहे.
300 रुपयांपासून ते 25 हजारांपर्यंत हुक्क्याच्या किंमती असून अनेक पार्टीजसाठी याची मागणी असते, घरोपच सेवेचे संपुर्ण काम फोनवरुन चालते. विविध फळांच्या नावावर हुक्क्याचे फ्लेवर असुन त्यामध्ये विविध अंमलीपदार्थ घालून दिले जातात… या एका हुक्क्याची किंमत तब्बल 20 ते 25 हजारांच्या घरात असते. अंमलीपदार्थ घालून देण्याचे उद्देश हा वेसन लागणे असा असतो. जेणेकरून एकदा एक गिऱ्हाईक आले की ते पुन्हा आपोआप आपल्याचकडे येणार! हा हुक्का शरीरास एवढा हानीकारक आहे की, कोणी नवख्या व्यक्तीने घेतल्यास त्याला हृदय विकाराचा झटका येऊ शकतो.
हुक्के दोन प्रकारचे असतात. एक तंबाखूयुक्त आणि विनातंबाखू. तंबाखुयुक्त हुक्क्याच्या अधिक सेवनामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, मूत्राशयाचा कर्करोग, हदयविकार, यकृताचा विकार असे आजार होण्याची भिती असते. घातक केमिकलसहीत, कोळसा, टार, कार्बोमोनाक्साईड आणि हायड्रोकार्बनचं प्रमाण हुक्कयात अधिक असते. त्यातून श्वसनाचे विकारही होतात. जेवणाच्या ठिकाणी हुक्का सेवन करणं तर अधिक घातक आहे.
सायंकाळ झाली की तरुणाई फक्त हुक्काची ‘ट्रिप’ अनुभवण्यासाठी यांच्याशी संपर्क करते. किशोर वयोगटातील मुला-मुली एकत्रीत पार्टी करतात मात्र मुंबई पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या हुक्का पुरवणाऱ्यांना कुठलीही भिती नसल्याचे चित्र आज मुंबईत आहे. यावर मुंबई पोलीस आता केव्हा कारवाई करतात हे पाहणे औत्स्युक्याचे ठारणार आहे.
मुंबईतील तरुण पिढीचे भविष्य धोक्यात
हुक्का पितानाचा राजेशाही थाट तरुणांना मोहात पाडतो हे खरंच. त्यापायी लाखो रुपयांची कमाई होते. गरीब घरातील मुलंही श्रीमंताचंच अनुकरण करू पाहतात. काही रहिवाशी इमारतींच्या बंद खोलीत या पार्ट्या रंगतात. ‘इन हाऊस पार्टीज’मध्ये हुक्का सहजपणे ओढला जातो. अशा ठिकाणी मुलींचे प्रमाणही वाढतेय. त्यामुळे नशेच्या धुंदीत मुलींसोबत लैंगिक छळाचेही प्रकार होतात अशा तक्रारी आहेत.
3 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद
राज्य सरकारने हुक्का पार्लर बंदी लागू केली होती. याबाबतची अधिसूचना गृहविभागाने जारी केली होती. सिगरेट आणि तंबाखू उत्पादनसंबंधी अधिनियम 2003 कायद्याचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपये दंड आणि 3 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. हुक्का पार्लर बंदी लागू करणारं महाराष्ट्र हे दुसरं राज्य आहे. याआधी गुजरातने हुक्का पार्लर बंदी लागू केली आहे. डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या नागपूर अधिवेशनात आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विधीमंडळात हुक्का पार्लर बंदी विधेयकाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर एप्रिलमध्ये हे विधेयक विधीमंडळात पारित झालं. राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारने ही अधिसूचना जारी केली आहे. लोअर परळ येथे कमला मिलमध्ये डिसेंबर 2017 मध्ये हुक्का पार्लरमुळे आग लागून 14 लोकांचा बळी गेला होता. त्यानंतर ही बंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
फ्रुट हुक्काची क्रेज
विविध फळांच्या नावावर हुक्क्याचे फ्लेवर असुन त्यामध्ये विविध अंमलीपदार्थ घालून दिले जातात… या एका हुक्क्याची किंमत तब्बल 20 ते 25 हजारांच्या घरात असते. अंमलीपदार्थ घालून देण्याचे उद्देश हा वेसन लागणे असा असतो. सिगारेटमधील तंबाखूत निकोटिन असते आणि ते आरोग्याला अपायकारक असते; मात्र त्याऐवजी रानपाला तसेच विविध फळे आणि फुलांच्या फ्लेवरचा वापर करून हुक्क्याद्वारे जेथे धूम्रपान करता येते, ते हुक्का पार्लर. धूम्रपानासाठी वापरण्यात येणा-या हुक्क्याची किंमत साधारणत: 800 ते 1500 रुपये असते. फ्लेवरमध्ये ‘स्ट्रॉबेरी’, ‘ऑरेंज’, ‘बनाना’, ‘ॲपल’, ‘डबल ॲपल’, ‘मँगो’ अशा अनेक फळा, फुलांचा समावेश असतो. या फ्लेवरचा एक डबा सुमारे 80 ते 100 रुपयांना बाजारात उपलब्ध असतो, परंतु पार्लरमध्ये एका फ्लेवरसाठी तासाला 150 ते 250 रुपये असा दर ग्राहकाकडून घेतला जातो. या फ्लेवर उत्पादनात देशातील अफजल, तर आखाती देशातील अलफकीर कंपनी आघाडीवर असून त्यांच्या ब्रॅण्डला सर्वाधिक मागणी असते सुत्रांकडून सांगण्यात आले.