प प्रतिनिधी
अकोला
शहरात उघड्यावर मांसविक्री होते. कोंबडीचे पंख, मांख सर्वत्र फेकले जाते. याचा शहरवासीयांना त्रास सहन करावा लागतो, असा आरोप करीत शिवसेनेच्या नगरसेवकांनी आमसभेदरम्यान सभागृहात मांस आणून फेकले. मनपाच्या कार्याचा निषेधही नोंदविला. याला सुरक्षारक्षकांनी विरोध दर्शविल्याने धक्काबुक्कीही झाली. महापौर म्हणून अर्चना मसने यांची ही पहिलीच आमसभा होती.
अकोला महापालिकेची आमसभा मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष म्हणून महापौर अर्चना म्हसने होत्या. तर उपमहापौर राजेंद्र गिरी, मनपा आयुक्त संजय कापडणीस, सभेचे सचिव म्हणून अनिल बिडवे यांची प्रमुख उपस्थिती होती. दुपारच्या सुमारास आमसभा सुरू झाली. मात्र शिवसेनेचे नगरसेवक राजेश मिश्रा, मंगेश काळे व शशी चोपडे यांनी एका पोत्यात कोंबडीचे पंख व मांस आणले. सभागृहातच महापौर, आयुक्त, उपमहापौर व उपस्थित नगरसेवकांसमोर टाकून दिले. शहरात बर्याच ठिकाणी उघड्यावर मांसविक्री होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यापासून रोगराई पसरण्याचीही शक्यता नाकारता येत नाही, याकडे लक्ष वेधले. पण, थेट सभागृहातच मांस आणण्यात आल्याने संताप व्यक्त झाला. त्यांच्या या कृतीला सुरक्षारक्षकांनी विरोध दर्शविल्याने नगरसेवकांसोबत धक्काबुक्की झाली. त्यामुळे सभागृहात गदारोळ उडाला होता. या प्रकारामुळे काही नगरसेवकांनी सभा रद्द करून थोड्या वेळाने घ्या अशी मागणी केली.