प वार्ताहर
अहमदनगर
रॅपलिंग करताना हरिश्चंद्रगडावरील कोकण कड्यावरून पडून प्रसिद्ध गिर्यारोहक अरूण सावंत (वय60) यांचा मृत्यू झाला आहे. अरूण सावंत यांच्यासह एकूण 30 जण हरिश्चंंद्रगडावर रॅपलिंगसाठी आले होते. सावंत हे शनिवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास बेपत्ता झाले होते. तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता. त्यानंतर रविवारी त्यांचा मृतदेह बचाव पथकाला सापडला. गोरेगावमधील नामवंत गिर्यारोहक, सह्याद्रीची घोरपड म्हणून ओळखले जाणारे अरुण सावंत यांचा शनिवारी हरिश्चंद्रगडावरील कोकणकड्यावरील मोहिमेत अपघाती मृत्यू झाला. रोप फिक्सिंग करताना अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांचा मृतदेह सापडला असून, दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रॅपलिंगचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण होत आला होता. या मोहिमेत 30 जण सहभागी झाले होते. सावंत हे मोहिमेचे प्रमुख होते. इतर 29 जण हे टप्पा उतरूनही आले होते. सावंत हे दोराच्या साह्यानं रॅपलिंग करत असताना, बेपत्ता झाले. तेव्हापासून त्यांच्याशी संपर्क झाला नव्हता. स्थानिक आणि इतर ट्रेकर्सच्या मदतीनं शोध घेण्यात येत होता. रविवारी अखेर त्यांचा मृतदेह सापडला. तो बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कोकण कड्याची उंची ही साधारण अठराशे फूट आहे. सावंत जिथून बेपत्ता झाले, ती उंची अंदाजे हजार फूट होती. हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याला असलेल्या गावापासून त्यांचा शोध घेण्यात येत होता. त्यांच्यासोबत असलेल्या इतर गिर्यारोहकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं होतं. मात्र, सावंत यांच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता. त्यानंतर रविवारी शोधमोहिमेदरम्यान त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.