अकोला : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाची तपासणी पथके सक्रिय झाली असून बुधवारी रात्री अकोला -मंगरूळपीर रोडवर निवडणूक आयोगाच्या पथकाने पाच लाख 38 हजार रुपये जप्त केले आहेत. ही कारवाई आचारसंहिता लागू झाल्यानंतर अकोला जिल्ह्यातील पहिलीच कारवाई आहे. जप्त केलेली रक्कम सध्या जमा केली असून, गुरुवारपासून चौकशीची प्रक्रिया सुरु होणार आहे. चौकशीअंती पुढील कार्यवाहीचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे.