प अकोला : अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सहा शेतकर्यांनी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. धुळे-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरच्या विस्तारीकरणात या शेतकर्यांची शेती गेली. गेल्या दोन वर्षांपासून या सगळ्यांना योग्य मोबदला देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. तसेच सोमवारी जिल्हाधिकार्यांनी त्यांना वाढीव मोबदला मिळणार नसल्याचं पत्र दिलं. त्यामुळे त्यांनी असा आत्मघातकी निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. विष प्राशन केलेल्या या सर्व शेतकर्यांची प्रकृती गंभीर आहे. अतिरीक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्यासमोर हा सर्व प्रकार घडला.